धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सर्व विजयी नगरसेवक तसेच उमेदवारांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध आघाड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षणाताई सलगर,प्रदेश सरचिटणीस मसूदभाई शेख,माजी नगराध्यक्ष खलिफाभाई कुरेशी, तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील भैया पाटील, परंडा तालुका अध्यक्ष किरण करळे, रंजीत तात्या बारकुल, महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखरजी घोडके, शहराध्यक्ष व नगरसेवक बबलूभाई शेख, उद्योग व व्यापारी जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने, बाजार समिती संचालक (कळंब), बाभळगावचे सरपंच, प्रा. तुषार वाघमारे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश तांबारे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिकभाई शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कसबे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अफसरभाई मुल्ला, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर, युवक भूम तालुका अध्यक्ष महेश चव्हाण, युवक प्रदेश सचिव रोहित बागल, युवक प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक खलिफाभाई कुरेशी, बबलू उर्फ आयाज शेख, इस्माईल शेख, सुनील आंबेकर, विशाल शिंगाडे, अजाज काझी, तेजस देवकते व सरफराज कुरेशी यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच अल्पमताने पराभूत झालेले उमेदवार राहुल गवळी, प्रशांत पवार, प्रियंका ताई गायकवाड, विलास अण्णा सांजेकर, ॲड. विवेक घोगरे, लखन चव्हाण, संध्याताई बागल, अजिंक्य हिबारे, अर्चना अंबूरे, सचिन बनसोडे, महेशजी बागल, नोविद शेख, नेहा ताई भावसार, पंकजजी भोसले, अशपाकभाई शेख, साईनाथजी कुराडे, रोहिणी ताई इंगळे, मिलिंद पेठे, हिना शेख, अहमदभाई बागवान, बाबा मुजावर, निलेश साळुंखे, उमेश शिरसाटे व मिसबा शेख यांचाही सन्मान करण्यात आला.
सर्व उमेदवारांनी पूर्ण ताकद, जिद्द व चिकाटीने निवडणूक लढवली, याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार आजही तळागाळात जिवंत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे धाराशिव नगर पालिकेतील हा ऐतिहासिक विजय असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागात सामाजिक कार्य व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची शपथ घेतली.
%20%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A5%80.jpeg)