धाराशिव (प्रतिनिधी)- अहमदिया मुस्लिम जमाअतची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया, उस्मानाबाद यांच्या ख़िदमते-ख़ल्ख़ (मानव सेवा) विभागातर्फे सायंकाळी 25 डिसेंबर 2025 रोजी शहरातील गरजू नागरिकांसाठी कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरातील दर्गा परिसर, चौक, झोपडपट्टी तसेच इतर विविध भागांमध्ये जाऊन सुमारे 300 कपड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कपड्यांचे दान केले होते. प्राप्त कपड्यांपैकी चांगल्या दर्जाचे कपडे निवडून गरजू व्यक्तींना सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमास मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया जिल्हाध्यक्ष राग़ेब अलीम, शहराध्यक्ष नदीम अहमद, अहमदिया मुस्लिम जमाअत अध्यक्ष अब्दुस समद, मानव सेवा विभागाचे चिटणीस सजील अहमद यांच्यासह अब्दुल अलीम, नासिर अहमद, मामून अहमद, मुताहिर अहमद, आदिल अहमद, तौसीफ अहमद, माज़ीन अहमद, शफीक अहमद तसेच इतर सदस्य उपस्थित होते.


 
Top