धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव येथील रोहित बागल यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आजीव सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यासह ग्रामीण भागात क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

या निवडीमुळे रोहित बागल यांना आता राज्याच्या क्रिकेट धोरणांमध्ये आणि प्रशासकीय निर्णयात सक्रिय सहभाग घेता येणार आहे. धाराशिवसारख्या भागातील क्रिकेटपटूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अंगभूत कौशल्याच्या बळावर संधी मिळवून देण्यासाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे. एमसीएचे अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना विविध स्तरावर त्यांची चमकदार कामगिरी सिद्ध करता येईल. असा विश्वास व्यक्त रोहित बागल यांनी व्यक्त केला आहे. ही नियुक्ती झाल्याबद्दल राजकीय आणि सामाजिक स्तरावरून बागल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 
Top