धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान, हिंदी भाषेचे सर्व श्रेष्ठ साहित्यिक भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त डॉ सी.आर.दापके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले,या प्रसंगी प्रा डॉ बालाजी गुंड,प्रा सचिन चव्हाण यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.
