परंडा (प्रतिनिधी)- भारतीय राजकारणातील शिखर पुरुष, लोकनायक, विलक्षण नेतृत्व, दूरदर्शी, अमोघ वक्ते, अजातशत्रू, माजी पंतप्रधान, प्रेरणास्त्रोत, भारतरत्न, श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयी जी यांना जयंतीनिमित्त नवनिर्वाचित नगरसेवक युवा नेते समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले..

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, ता. उपाध्यक्ष डॉ. अमोल गोफणे, हरी शिंदे, बाबासाहेब जाधव, किरण देशमुख, जोतीराम गिरवले, साहेबराव पाडुळे, तानाजी घोडके, निशीकांत क्षिरसागर, सारंग घोगरे, रामदास गुडे, बाळासाहेब गिरी, सागर पाटील, योगेश डांगे, अभिषेक चोबे, डॉ. आनंद मोरे, धनंजय काळे, गजानन तिवारी, अमर ठाकूर, गौरव पाटील, संतोष गायकवाड, सिध्दीक हन्नूरे, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, तुषार कोळेकर, जयंत भातलवंडे तसेच इतर मान्यवर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top