भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे दि. 22 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे अध्यक्ष डॉ. अनुराधा जगदाळे व प्रमुख पाहुणे डॉ. एस. एस. शिंदे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रामानुजन यांच्या गणित क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव करत विद्यार्थ्यांना संशोधनशील व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळ, पाथरूड येथील सहसचिव व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. शिंदे यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये इतिहास विभाग प्रमुख डॉ. गव्हाणे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. आर. बोराडे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. सुरवसे गोकुळ, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नितीन पडवळ, प्रा. तेािरे, गणित विभाग प्रमुख प्रा. जी. डी. कऱ्हाळे, प्रा. ए. एल. डोंगरदिवे, तसेच प्रा. एन. आर. जगदाळे, प्रा. भांडवलकर, प्रा. आर. एस. गायकवाड, प्रा. खंदारे, प्रा. खराटे सर प्रा. अमोल कुटे, प्रा. राहुल राठोड, प्रा. मसराम, प्रा. भोंग, प्रा. एल व्ही पवार सर, प्रा. गरड सर, प्रा. बारकुल सर , प्रा. जगदाळे सर प्राध्यापिका तावरे मॅडम, सुतार मॅडम, अलगुंडे मॅडम, प्राध्यापिका  अंबोरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भिंतपत्रिका  प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात थोर गणितज्ञांचे कार्य, विविध गणितीय संकल्पना, सूत्रे तसेच दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण व सर्जनशील सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाविषयी गोडी निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत झाली. कार्यक्रमाचे आयोजन गणित विभागाने केले असून, मार्गदर्शन प्रा. जी. डी. कऱ्हाळे व प्रा. ए. एल. डोंगरदिवे यांनी केले.

 
Top