कळंब (प्रतिनिधी)- येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना-भाजपच्या राणी उर्फ सुनंदा कापसे या 2254 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर भाजप व शिवसेना गटाचे 10 नगरसेवक ही निवडून आणण्यात यश आले आहे . तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस यांच्या पदरात केवळ 10 नगरसेवक निवडून आले तर अजित पवार (गट) व शरद पवार (गट) राष्ट्रवादी यांच्या मात्र चांगला सुपडा साफ झाला आहे . संपूर्ण निवडणूक ही तिरंगी झाली होती, मात्र त्यांना एकाही जागेवर यश प्राप्त झाले नाही.
कळंब नगर परिषदेच्या एक नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात होते त्यात शिवसेना-भाजप महायुतीचे राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांना 7 हजार 689 मते मिळाली तर त्यांचा 2254 मतांनी त्या विजयी झाल्या त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे (गट) व काँग्रेस यांच्या युतीमधून रश्मी संजय मुंदडा या उभ्या होते त्यांना 5 हजार 435 मते मिळाली तर तिसऱ्या नंबर वर फेकल्या गेलेल्या अजित पवार व शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या मीनाक्षी श्रीधर भवर यांना 1760 मते मिळाली. राष्ट्रवादी गटाकडून एकही नगरसेवक मात्र खाते उघडू शकले नाहीत. कळंब नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी 10 प्रभागात 20 नगरसेवक पदासाठी झाली यात एकूण नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात होते. तर 20 नगरसेवक पदासाठी 67 उमेदवार रिंगणात होते. शहरात एकूण 24 मतदान केंद्रावर 20 हजार 958 मतदारापैकी 15 हजार 234 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 10 वाजता शहराबाहेर असलेल्या श्री संत गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी 10 वाजता सुरू झाली. यात 10 टेबलवर 3 फेऱ्यात ही मतमोजणी संपन्न झाली.
यात विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग 1 (अ) मधून योजना अनंत वाघमारे 595 (कमळ), प्रभाग 1 (ब) मधून शीतल चोंदे (कमळ) यांनी 515 मते घेऊन विजयी झाले आहेत. प्रभाग 2 (अ) मधून ज्योती हरकर ( मशाल) यांनी 826 मते घेऊन तर प्रभाग 2 (ब) मधून खाटीक जमील महंमद (मशाल ) यांनी 717 मते घेऊन विजयी झाले आहेत. प्रभाग 3 (अ) मधून इंदुमती हौसलमल (मशाल) यांनी 886 मते घेऊन तर प्रभाग 3 (ब) मधून रोहन पारख (धनुष्यबाण) यांनी 861 मते घेऊन विजयी झाले आहेत. प्रभाग 4 (अ) मधून लखन गायकवाड (कमळ) 546 मते घेऊन तर प्रभाग 4 (ब)मधून आशा भवर (मशाल) यांनी 724 मते घेऊन विजयी झाले आहेत. प्रभाग 5 (अ) मधून सागर मुंडे (मशाल) यांनी 820 मते घेतली. तर प्रभाग 5 (ब) मधून सफुरा शकील काझी (मशाल) यांनी 778 मते घेऊन विजयी झाले आहेत. प्रभाग 6 (अ) मधून हर्षद अंबुरे (कमळ) यांना 585 मते मिळाली तर प्रभाग 6(ब) मधून अर्चना मोरे यांनी (हात) या चिन्हावर 658 मते घेऊन विजयी झाले आहेत. प्रभाग 7(अ) मधून पूजा धोकटे या (धनुष्यबाण) घेऊन यांना 894 मते मिळाली तर प्रभाग 7 (ब ) मधून अमर चाऊस (धनुष्यबाण) यांना 1049 मते घेऊन विजयी झाले आहेत . प्रभाग 8(अ) मधून वनमाला वाघमारे (मशाल) यांनी 657 मते घेतली तर प्रभाग 8(ब)मधून मोसिन सलीम मिर्झा (मशाल) यांनी 702 मते घेऊन विजयी झाले आहेत . प्रभाग 9-अ मधून रुकसाना बागवान (मशाल )यांना 627 मते मिळाली तर प्रभाग 9 ब मधून अतुल कवडे (धनुष्यबाण) यांनी 741 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर प्रभाग 10 (अ) मधून शाला शिवा पवार (कमळ ) यांनी 506 मते घेतली तर प्रभाग 10 (ब) मधून भूषण करंजकर (कमळ) 819 मते घेऊन विजयी मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपाला 6, धनुष्यबाणाला 4, मशालीला 9 तर हाताला 1 जागा मिळाली आहे. तर दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र आपले खाते उघडता आले नाही. विजयी उमेदवारांनी मात्र शहरातून गुलाल उधळत जल्लोष साजरा केला तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून कळंब पोलिसांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.