कळंब (प्रतिनिधी)- येथील नगर परिषद अंतर्गत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दि . ०२ दिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून सदरील मतदान प्रक्रियेची मतमोजणी ही दि. २१ डिसेंबर रोजी रविवार सकाळी १० पासून सुरुवात होणार आहे . सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी मतमोजणी श्री. संत गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंब येथे होणार आहे .मतमोजणी प्रकिया नियोजित वेळेत पार पडावी यासाठी कळंब नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे कळंब शहरातील १० प्रभागासाठी १० टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. यामधील प्रभाग क्र.१,४,५,६,९व १० या प्रभागात २ मतदान केंद्र असल्याने २ राऊंड मध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल व प्रभाग क्र.२,३,७ व ८ मध्ये ०३ मतदान केंद्र असल्याने ०३ राउंड मध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल याबाबत नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी साधारण १० टेबलवर २० प्रशिक्षित कर्मचारी व १० वर्ग -४ मधील कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संगणक व सारणी कामकाज साठी ६ कर्मचारी इतर कामासाठी ८ कर्मचारी याची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक-४, पोलीस उपनिरीक्षक-३, पोलीस कर्मचारी -७५ व होमगार्ड -५० असे मिळून १३३ पोलीस कर्मचारी यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे. सदरील सर्व मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी कळंब नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ तथा तहसीलदार हेमंत ढोकले, सहा .निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद , श्रीमती मंजुषा गुरमे व अति. सहा .निवडणूक निर्णय अधिकारी गोकुळ भराडीया यांच्या नियंत्रणा खाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.