कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील हसेगाव के. येथील पर्याय सामाजिक संस्था कॅम्पस मध्ये दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी महिला बचत गट सदस्य आणि फायनान्स कर्मचारी यांच्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी साधन संस्थे कडून मेहताब आलम तसेच अनिक फायनान्शिअल सर्व्हिसेस चे व्यवस्थापकीय संचालक माननीय विश्वनाथ तोडकर,
मुख्यालयाचे माननीय यशवंत आहेर, तेजश्रीताई तोडकर, अनिक धाराशिव जिल्हा ऑपरेशन हेड * विलास गोडगे, तसेच अनिकचे संचालक ऋषिकेश तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या आर्थिक साक्षरता कार्यशाळेसाठी गटप्रमुख महिला तसेच अनिक धाराशिव अंतर्गत सर्व शाखांमधील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या कार्यशाळेत सा-धन चे मेहताब आलम यांनी खालील महत्त्वाच्या आर्थिक विषयांवर मार्गदर्शन केले. बँक खाते आणि बचतीचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीने सुरक्षित संस्थेत बँक खाते उघडून नियमित बचत करणे व आपत्कालीन गरजांसाठी आर्थिक शिस्त ठेवणे आवश्यक आहे.
बजेटिंग व आर्थिक नियोजन
उत्पन्न व खर्च यामध्ये समतोल राखण्यासाठी बजेट तयार करणे, गरजा व इच्छा यामधील फरक समजून घेणे आणि भविष्यातील उद्दिष्टांसाठी नियोजन,
डिजिटल बँकिंग व सुरक्षित व्यवहार
UPI, ATM, मोबाईल बँकिंग यांचा सुरक्षित वापर, PIN किंवा OTP कोणालाही न देणे आणि फसवणुकीपासून सतर्क राहणे.
सरकारी योजना व सामाजिक सुरक्षा
प्रधानमंत्री जन-धन योजना, विमा योजना, पेन्शन योजना व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्याचे महत्त्व,
कर्ज व्यवस्थापन व क्रेडिट स्कोअर
गरजेपुरते व उत्पादक उद्देशासाठीच कर्ज घेणे, वेळेवर परतफेड करणे आणि चांगला क्रेडिट स्कोअर राखणे, आदी विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन मिळाले.
