धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या वाणिज्य शाखेच्या पदव्युत्तर विभागात शिक्षण घेत असणारी विद्यार्थीनी कु शेख सबा रियाजोद्दीन हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सी ए च्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची बाहेरील ट्युशन न लावता फक्त वाणिज्य विभागातील शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार सदर विद्यार्थ्यांनीनी हे मोठे यश प्राप्त केले आहे. सदर यशा बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते सबा शेख हिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. बालाजी नगरे, डॉ अमर निंबाळकर, प्रा. अभय देशमाने, पालक जैनुद्दिन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
