धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासन नांदेड, जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा कार्यालय नांदेड, मेरा भारत व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय चित्रकला स्पर्धेत जगदीश सुतार यांची धाराशिवचे प्रतिनिधित्व करत विभागातून द्वितीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी तथा सर्व अतिथिच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. पुढील राज्यस्तरीय सादरीकरणासाठी क्रीडाधिकारी कार्यालय नांदेड व धाराशिवकडून यांच्याकडून खास शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुतार यांचे अभियांत्रिकी शिक्षण चालू असून महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंग माने व समन्वयक डॉ. सुशीलकुमार होळंबे, संस्थेचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील, मल्हार पाटील व ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी प्रतिनिधित्वसाठी सुतारचे अभिनंदन व कौतुक केले.
