वाशी (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी येथे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ‌‘आनंद बाजार‌’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सोमनाथ घोलप, शिक्षणविस्ताराधिकारी सुधाकर कोल्हे, शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती टेकाळे मॅडम,  काझी मॅडम उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हंसराज कवडे, उपाध्यक्ष  विकास क्षिरसागर, समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सविता मोळवणे मॅडम व शिक्षकवृंद सुनिता वाकडे, ज्ञानेश्वर जानगेवाड, सविता महामुनी यांची उपस्थिती लाभली.

या आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी घरी तयार करून आणलेले खाद्यपदार्थ व इतर वस्तूंना पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. पालकांनी सर्व स्टॉलला भेट देत खरेदी केली व पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. या उपक्रमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 22,950 रुपयांची आर्थिक उलाढाल केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर जानगेवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन सविता महामुनी यांनी केले. आनंद बाजार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता, व्यवहारज्ञान व आत्मविश्वास वाढीस लागल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 
Top