उमरगा (प्रतिनिधी)- जागतिक, देशपातळीवरील अनेक उदाहरणे आकडेवारीसह दिली. युरोपातील प्रबोधनाची क्रांती व इतर राजकीय क्रांत्या या वाचन संस्कृतीतून व एका ठराविक विचाराने लोक जागृत झाल्याने घडल्या. वाचन संस्कृती हाच जगातील सर्व परिवर्तनाचा मुलाधार असल्याचे प्रतिपादन केले. भारतात उत्तरेपेक्षा दक्षिणेतील राज्ये अधिक प्रगत आहेत, त्याचे कारण तिथे रुजलेली शैक्षणिक आणि वैचारिक बीजे आणि खोलवर रुजलेली वाचन संस्कृती आहे. असे मत लेखक, अर्थतज्ञ आणि डाव्या-पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. अजित अभ्यंकर व्यक्त केले.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून केशव उर्फ बाबा पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, कैलास शिंदे, हरीश डावरे, हरी जाधव, कॉ. सुनिता रेणके, अमर देशटवार, विठ्ठल चिकुंद्रे, रविकिरण बनसोडे, अ. रजाक अत्तार, ऍड. दिलीप सगर, सुनंदा माने, रेखा पवार, राजू तोरकडे, रणधीर पवार, उद्धवराव गायकवाड, सुधाकर पाटील, अमोल बिराजदार, डॉ. उदय मोरे, विवेक हराळकर आदींची उपस्थिती होती. वाचनालयाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. हे पुरस्कार वितरणाचे 07 वे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात संपन्न झाला. डॉ. दामोदर पतंगे यांना जीवन गौरव, वसंतराव नागदे यांना सहकाररत्न, डॉ. दीपक पोफळे यांना समाजरत्न, अनिल जगताप यांना कृषीरत्न, सतीश पवार यांना उद्योगरत्न, बालाजी बिराजदार यांना पत्रकाररत्न, रामजी साळुंके यांना शिक्षकरत्न, भाग्यश्री औरादे यांना ग्रंथसेवा, विशाल काणेकर यांना कलारत्न, महादेव शिंदे यांना उत्कृष्ट वाचक आणि गौरी कांबळे यांना संगीतरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक ॲड. शीतल चव्हाण यांनी केले. आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणातून प्रा. चव्हाण वाचनालयास सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन देत पुरस्काराच्या मानकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. वसंतराव नागदे, डॉ. दीपक पोफळे यांची मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन ऍड. एस. पी. इनामदार यांनी केले. तर आभार प्रदर्शन ॲड. ख्वाजा शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताबाई चव्हाण, सत्यानारायण जाधव, ऍड. अर्चना जाधव, प्रदीप मोरे, राजू भालेराव, करीम शेख, माधव चव्हाण, धानय्या स्वामी, किशोर बसगूंडे, राजू बटगिरे, अनुराधा पाटील, प्रदीप चौधरी, संतोष चव्हाण, माधवराव गावकरे, विजय चितली, ज्योती माने, शबाना उडचणे, बबीता मदने, धनंजय गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.
