तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज सपत्नीक श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत केले. मंदिर संस्थानच्या वतीने जाधव दांपत्याचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, नागेश शितोळे, सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर, सुजय मेश्राम, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, श्रीकांत पवार, ऋषभ रेहपांडे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
