धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना खेळाच्या सरावात सातत्य ठेवण्याचा व क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याचा सल्ला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी व सरचिटनिस महाराष्ट्र राज्य खो-खो संघटना, उपाध्यक्ष महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दिला.
महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे जिल्हयामध्ये क्रीडाविषयक वातावरणाकरिता दिनांक 12 ते 18 डिसेंबर, 2025 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्रीपतराव भोसले हायस्कुल, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 डिसेंबर,2025 रोजी श्रीपतराव भोसले विद्यालयात क्रीडा सप्ताह कार्यक्रमाचा उद्याटन समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. श्रीपतराव भोसले हायस्कुलचे कार्यकारी अधिकारी अदित्य पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच श्रीपतराव भोसले हायस्कुलचे उपमुख्यध्यापक प्रमोद कदम, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी प्रविण बागल, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे व तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे सन्मानचिन्ह देवुन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत हरनाळे यांनी केले. तर अदित्य पाटील यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीयस्तरावर प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जवळपास 450 विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक शुभांगी रोकडे यांनी केले. तर आभार भैरवनाथ नाईकवाडी यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा कार्यकारी अधिकारी निकिता पवार, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, जान्हवी पेठे, सुरेश कळमकर आदिंनी परिश्रम घेतले.
