भूम (प्रतिनिधी)-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य  संस्था पंचायत समिती व जिल्हा परिषद वर भगवा फडकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. असे आवाहन धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपर्कप्रमुख यांना जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन संघटनात्मक आढावा घेण्याचे आदेश दिल्याने भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये जावून आढावा बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी यांनी गाव पातळीवर बूथ स्ट्राँग करून  येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकवावा असे आवाहन देखील जिल्हा धाराशिव संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी केले आहे. यावेळी भूम परंडा वाशी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीसाठी भूम, परंडा, वाशी विधानसभा संपर्कप्रमुख संजय नटे, शिवसेना जिल्हाप्रमुख रंजीत पाटील, भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे, मेघराज पाटील, तात्यासाहेब गायकवाड, चेतन बोराडे, प्रल्हाद आडागळे, भगवान बांगर, दिलीप शाळू, दीपक मुळे, कोहिनूर सय्यद, रईस मुजावर, विहंग कदम, संभाजी गरड,राजु विर, पिंटू माळी, शहाजी जगदाळे, अंगद जगदाळे, बापूसाहेब कावळे, श्रीमंत बडके, रफिक तांबोळी, अब्दुल सय्यद, आदी उपस्थित होते.

 
Top