धाराशिव (प्रतिनिधी)-ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ,दिल्ली या संघटनेच्या वतीने झेलम शिंपले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून झेलम नारायण शिंपले यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंह होळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. पंकज भिवंटे, रामकिसन रौंदळे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या पत्राद्वारे मराठवाडा विभाग संपर्कप्रमुख अनिल गोयकर यांच्या उपस्थित धाराशिव जिल्हाध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल सर्व मराठवाडा व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांच्य वतीने झेलम शिंपले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
