भूम (प्रतिनिधी )- भूम नगरपालिका निवडणुकीची तयारी निवडणूक विभागाकडून करण्यात आली असून शहरातील २१ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे .दरम्यान येथील पारडी रोडवरील आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे बुधवारी मतमोजणी होणार आहे .
शहरातील एकूण १० प्रभागात यामध्ये महिला मतदार ९२२८पुरुष मतदार ८८४९ एकूण १८०७७ मतदार आहेत . २१ मतदान केंद्र आहेत .प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष , तीन मतदानाधिकारी ,एक पोलीस कर्मचारी ,एक महिला कर्मचारी एकूण सहा कर्मचारी असणार आहेत . एकूण १०५ कर्मचारी असणार आहेत तर १० राखीव कर्मचारी राहणार आहेत .यामध्ये चार झोन नुसार २१ केंद्रावर २१ अमलदार २९ होमगार्ड ,प्रत्येक झोनमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक , ३ कर्मचारी , २ होमगार्ड असणार आहेत . या दिवशी चार क्षत्रिय अधिकारी राहणार आहेत .निवडणूक निर्णय अधिकारी रैवयाह डोंगरे ,तहसीलदार जयवंत पाटील ,मुख्याधिकारी शैला डाके काम पाहत आहेत .