धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांचा पदग्रहण समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, अर्चना पाटील उपस्थित राहून जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे, समन्वयाने आणि कटिबद्धतेने काम करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्यांना भावी कार्यासाठी काकडे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित सर्व पक्षाच्या नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. शहराच्या समस्या सोडवण्यासाठी, आपल्या धाराशिवचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. आपणही यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास सर्वांना दिला. यावेळी दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, मल्हार पाटील, अमित शिंदे, नितीन भोसले, भारत डोलारे, दत्ता बंडगर, खंडेराव चौरे, यांच्यासह नूतन नगरसेवक, माजी नगरसेवक, भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व शहरवासीय उपस्थित होते.
