धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा साकारण्यात यावा यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वप्रथम नगरसेविका सिंधुताई पेठे यांनी 2011 ला नगर परिषदेमध्ये ठराव मांडून तो मंजूर करून घेण्याचे अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक काम केले. 2011 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत सामाजिक कार्यकर्ते दत्ता पेठे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा शासकीय दूध डेअरीच्या एक एकर जागेमध्ये उभारण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ती जागा विनामूल्य दिली असून यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 50 लाख रुपये व नगर विकास विभागाच्यावतीने सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये आ. राणाजगजितसिह पाटील यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यासाठी दत्ता पेठे यानी सातत्याने व अखंडपणे प्रयत्न केले.

 
Top