परंडा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या अन् भल्याभल्यांना अंदाज न आलेल्या परंड्याच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे जाकीर सौदागर अवघ्या 189 मतांनी विजयी झाले. त्यांनी सर्वपक्षीय जनशक्ती नगरविकास आघाडीचे उमेदवार विश्वजित पाटील यांचा पराभव केला.पालिकेत शिवसेनेला बहुमत मिळविता आले नाही.असे असले तरी या निमित्ताने शिवसेनेचे आमदार प्रा.तानाजी सावंत यांची राजकीय कोंडी करण्याचा जनशक्ती नगर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले सत्ताधारी दोन माजी आमदार व सर्वपक्षीय नेत्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आमदार सावंत यांना यश आले. 10 प्रभागसाठी नगरसेवकपदाच्या वीस जागापैकी 12 जागांवर जनशक्ती नगर विकास आघाडीने विजय मिळवला.
शिवसेनेला आठ जागा जिंकता आल्या. नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना 6.795 मते मिळाली तर जनशक्तीचे विश्वजित पाटील यांना 6,606 मते मिळाली. यामध्ये सौदागर 189 मतांनी विजयी झाले. नोटाला 67 मते पडली. नगर परिषद निवडणुकीसाठी 13 हजार 468 मतदान झाले होते.
प्रभाग 1 अ आघाडीच्या रत्नमाला बनसोडे यांना 938 मते मिळाली, शिवसेनेच्या आदिका पालके यांना 765 मते मिळाली. प्रभाग 1 ब आघाडीचे श्रीकृष्ण विधाते यांना 946 मते मिळाली. प्रभाग दोन अ-आघाडीच्या रुक्साना बेगम पठाण यांना 681 मते मिळाली. 2 ब शिवसेनेचे सरफराज कुरेशी यांना 651 मते मिळाली. 3 अ आघाडीच्या परवीन बासले यांना 762 मते मिळाली. 3 ब आघाडीचे मदनसिंह सद्दीवाल यांना 709 मते मिळाली. 4 अ - आघाडीच्या मदीनाबी पठाण यांना 641 मते मिळाली. 4 ब आघाडीचे समरजीतसिंह ठाकिर यांना 676 मते मिळाली. 5 अ-शिवसेनेच्या शमीम तांबोळी यांना 691 मते मिळाली. 5 ब शिवसेनेचे सत्तार पठाण यांना 663 मते मिळाली. 6 अ-आघाडीचे अनिल शिंदे यांनी 792 मते मिळवली. 6 ब-आघाडीच्या वैशाली अलबत्ते यांना 792 मते मिळाली. 7 अ-आघाडीचे आब्बास मुजावर यांना 943 मते मिळाली. 7 ब-आघाडीच्या रुखियाबी दहेलूस यांना 940 मते मिळाली. 8 अ-शिवसेनेचे साबेर सौदागर यांना 931 मते मिळाली. 8 ब-शिवसेनेच्या आमीनाबी मुजावर यांना एक हजार दोन मते मिळाली.
9 अ-शिवसेनेच्या मन्नाबी जिनेरी यांना 568 मते मिळाली. 9 ब-शिवसेनेचे चंद्रकांत गायकवाड यांना 529 मते मिळाली. 10 अ शिवसेनेच्या वनमाला शिंदे यांना 525 मते मिळाली. 10 ब-आघाडीचे रमेशसिंह परदेशी यांना 460 मते मिळाली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
