परंडा (प्रतिनिधी)-  शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर यांनी अटतटीच्या निवडणुकीत 189 मतांनी नगराध्यक्षपदावर बाजी मारली आहे. विशेष म्हणजे शिंदे शिवसेनेविरूध्द सर्वपक्षीय आघाडी या निवडणुकीत होती. 

 या मत मोजणीत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांना एकूण मते 6795 मिळाली तर जनशक्ती नगर विकास आघाडीचे विश्वजित पाटील यांना 6606 मते मिळाली. यामध्ये जाकीर सौदागर यांना 189 मतांनी विजयी झाले आहेत. तर नोटाला एकूण 67 मते पडली.एकूण मतदान 13468 झाले. 10 प्रभागा साठी 20 नगरसेवक जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला 8 तर जनशक्ती विकास आघाडीला 12 जागांवर विजय मिळाला आहे. जनशक्ती नगर विकास आघाडीचे छत्री विरुध्द शिवसेना (शिंदे) धनुष्यबाण अशी अतितटीची निवडणूक रंगली. यात नगराध्यक्ष पदासाठी 2 तर सदस्यपदाच्या 20 जागांसाठी 43 जणांनी आपले नशिब अजमावले होते.

भूम -परंडा - वाशीचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या विरोधात भाजप सह सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.अत्यंत चुरसीच्या या झालेल्या निवडणुकीमध्ये जनशक्तीतचे विश्वजीत पाटील यांचा निसटता पराभव झाला असला तरी जनशक्ती नगर विकास आघाडीचे 12 नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. जाकीर सौदागर यांनी नगराध्यक्ष पदावर दुसऱ्यांदा विजय मिळवले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीची उत्सुकता जिल्ह्यात लागली होती. त्याचा निकाल आज लागला असून यमध्ये सत्ताधारी शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. या निवडणूकीत माजी आमदार राहुल मोटे, भाजपाचे माजी आमदार सुजित ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असला तरी ठाकूर, सद्दीवाल यांना आपल्या मुलांना निवडूण आणण्यास यश मिळाले. तरी उबाठाचे जिल्हाध्यक्ष रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना आपल्या भावास नगराध्यक्ष पदासाठी निवडून आणण्यास अपयश आले आहे.

 
Top