धाराशिव (प्रतिनिधी)- मालाविषयक व शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्तीत जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र यांनी देवून, उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रशस्तीपत्र देवून पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपअधिक्षक डॉ. निलेश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्नपुर्णा मस्के, पोलीस उपनिरीक्षक अनिल धनुरे, पोलीस हवलदार सगंणा वगले, मपोहेकॉ सोनाली जाधव, मपोना रोहीणी धुमाळ सर्व नेमणुक पिंकपथक पोलीस उप अधीक्षक कार्यालय तुळजापूर, यांनी गुप्त बातमीचे आधारे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण, दत्तात्रय राठोड, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, मपोहेकॉ शोभा बांगर व कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोस्टे नळदुर्ग यांनी आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणला. पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस हावलदार बाबासाहेब जाधवर व कर्मचारी पोलीस ठाणे वाशी यांनी गुन्हयातील आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणाला. पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, आनंदनगर पोलिस ठाणे कर्मचारी यांनी दरोड्याच्या तयारीत असलेले 3 आरोपीस स्थानिक लोकांचे मदतीने ताब्यात घेतले. तसेच सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर सुर्यवंशी व कर्मचारी यांनी सीईआयआर या पोर्टलचा वापर करून हरवलेले एकुण 41 मोबाईल हस्तगत केले. तसेच मपोहेकॉ मिनाक्षी माळी नेमणुक पोलीस आनंदनगर यांनी पोलीस ठाणे आनंदनगर येथील सन 2025 मधील 63 मिसींग व्यक्तीचा शोध घेवून मिसींग निर्गती केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.