मुरुम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव काका पाटील यांची भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मुरुम येथील त्यांच्या निवासस्थानी दि.26 डिसेंबर 2025 रोजी भेट घेऊन सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.व तसेच माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांचाही नुतन नगराध्यक्ष बापुराव काका पाटील व युवा नेते शरण पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील,भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,परंडा न.प. नवनिर्वाचित नगरसेवक रमेशसिंह परदेशी, भाजपा उमरगा शहराध्यक्ष ॲड साईराज टाचले, नगरसेवक तथा भाजपा मुरुम शहराध्यक्ष गणेश अंबर,महालिंग बाबशेट्टी,राजूभाई मुल्ला,उत्कर्ष गायकवाड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top