कळंब (प्रतिनिधी)- राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून त्यामुळे आता प्रत्येकालाच पालिकेची पहिली बैठक कधी होणार याची उत्सुकता लागली आहे. कळंब नगरपालिकेचे कारभारी सुनंदाताई शिवाजी कापसे ह्या निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे आता नूतन नगरसेवकांना पालिकेची बैठक कधी होते याकडे शहरवासीयांचे नजरा लागल्या आहेत. उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांच्या नावाची शहरवासीयामधून मागणी होत असुन चर्चेला उधाण आले आहे.
येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या सौ.सुनंदा ताई कापसे 2554 मताने विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर महायुतीचे दहा नगरसेवक ही निवडून आणण्यात यश आले आहे. तर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस यांच्या पदरात केवळ दहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. ही निवडणूक तिरंगी झाली होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादीना एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. त्यात शिवसेना-भाजप महायुतीच्या सुनंदा ताई शिवाजी कापसे ह्या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या आहेत. तर उप नगराध्यक्ष पदासाठी शितल चोंदे यांच्या नावाला शहरात चांगलेच चर्चेला उधान आले आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लावून राहिले आहे.
