भूम, (प्रतिनिधी)- येथील ग्रामदैवत आलमप्रभू यात्रेचा सोमवारी दि. 15 डिसेंबर रोजी जंगी कुस्त्यांनी समारोप झाला. शनिवार, रविवार व सोमवारी यात्रेमुळे भूम शहर गजबजून गेले होते. या कुस्तीच्या फडात विविध भागांतील नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला, चित्तथरारक कुस्तीने यात्रेची सोमवारी सांगता झाली. श्री आलमप्रभू ट्रस्टच्या वतीने कीर्तन, कलगीतुरा, लावण्यांसह कुस्तीचा फड आदी कार्यक्रमांना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यात्रेत सर्व जातिधर्माचे लोक उत्साहात सहभागी झाले. सर्कस, लहान मुलांचे मनोरंजनाचे उपक्रम यात्रेत दाखल झाले होते. यात्रेत ग्रामीणसह शहरातील माहेरवासिनी हजेरी लावतात.

सर्वच मल्लांच्या कुस्ती रंगतदार झाल्या. आलम प्रभू ट्रस्टच्यावतीने पारितोषिक देण्यात आले. पंच म्हणून भूम येथील वरिष्ठ पैलवानांनी काम पाहिले. तीन दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रेसाठी पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवून नियोजन केले होते. यावेळी भूम शहरातील माजी मल्लांनी पंच म्हणून काम पाहिले. कोल्हापूर ,सोलापूर, अहमदनगर, बीड, धाराशिव आधी ठिकाणाच्या मल्लांनी हजरी लावली. शहरातील व तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी वस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

 
Top