भूम (प्रतिनिधी)- भूम येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय वकील मंडळ भूम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी भूम येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये एकूण 1096 प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी 69 निकाली काढण्यात आली. ज्यामध्ये पक्षकारांना रक्कम रुपये 1 कोटी 23 लाख 98654 रुपये पक्षकारांना देण्याची निश्चित झाली. तसेच लोक आदालतीमध्ये वाद पूर्व एकूण प्रकरणी 938 त्यापैकी 430 आपापसात तडजोडीने मिटविण्यात आले. ज्यामध्ये रुपये 1293890 वसूल करण्यात आली लोक अदालत मध्ये पाच पॅनल द्वारे कामकाज पाहण्यात आले यामध्ये भूसंपादन कौटुंबिक वाद मोटरा अपघात दिवाणी फौजदारी बँका फायनान्स ही प्रकरणे ठेवण्यात आली होती. ज्यामध्ये अनुक्रमे रुपये 12398654 व 1293890 वसूल करण्यात आले लोक अदालती मध्ये पाच पॅनल द्वारे कामकाज करण्यात पाहण्यात आले. लोकअदालतीमध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश भास्कर धर्माधिकारी साहेब दिवानी न्यायाधीश व स्तर भगवान पंडित साहेब, न्यायाधीश राहुल डांगे साहेब, दिवाणी न्यायाधीश क स्तर जोंधळे मॅडम व न्यायाधीश आश्लेषा मते मॅडम व वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड.पंडितराव ढगे हे उपस्थित होते. तसेच तालुका विधि सेवा समितीचे कर्मचारी व लोकअदालत येथील पंच यांनी कामकाज पाहिले या लोक अदालतीत प्रकरणाचे निकालीकरण व तडजोडीमुळे न्यायालयीन कार्यक्षमतेत मोठा फायदा झाल्याने सांगितले जात होते.
