वाशी (प्रतिनिधी)- पाटसांगवी शिवारातील दुधना नदी परिसरात 70 वर्षीय वृद्धेवरील अत्याचार प्रकरणात अटकेतील आरोपी रमेश हरिदास नायकिंदे याला जिल्हा व सत्र न्यायालय, भुम यांनी अटींसह जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणाची सुनावणी बी. जी. धर्माधिकारी यांच्या न्यायालयात सुरु आहे.

फिर्यादी अजिनाथ रंगनाथ खिंडकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार घटना 20 जुलै 2025 रोजी घडली असून संबंधित  30 जुलै 2025 रोजी रात्री 11.17 वाजता भुम पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. या प्रकरणात कलम 64 व 351(3) अंतर्गत गुन्हा नोंद आहे. तपासाची जबाबदारी तपासीक एस. एफ. मुल्ला यांनी पार पाडली.

सुनावणीच्या वेळी बचाव पक्षाचे वकील ॲड. ए. एच. शेख यांनी नोंदविण्यात झालेला विलंब, पीडितेच्या निवेदनातील विसंगती, घटनास्थळी ठोस व वस्तुनिष्ठ पुरावे न सापडणे तसेच वैद्यकीय अहवालात गंभीर जखमांची नोंद नसल्याचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. या सर्व बाबींवरून आरोप सिद्ध होत नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून व परिस्थितीचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपी रमेश नाईकिंदे यांना अटी व शर्थींसह जामीन मंजूर केला.

 
Top