धाराशिव (प्रतिनिधी)- उच्चशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, निष्कलंक, शिस्तप्रिय आणि जबाबदार व्यक्ती देशाच्या लोकसभा अध्यक्षपदी, कॅबिनेट मंत्रीपदावर, विशेषतः गृहमंत्रीपदावर असणे ही देशाची प्रतिष्ठा उंचावणारी बाब आहे. दिवंगत डॉ. शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केंद्रीय गृहमंत्री या नात्याने हे अनेकदा सिद्ध केले. आयडिया ऑफ इंडियाशी वैचारिक बांधिलकी जपत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पेलल्या. मृदु पण स्पष्ट भाषा, उत्तम, दर्जेदार इंग्रजी, अतिशय संयमी आणि मुद्देसूद, अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांची खासियत होती. त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे, श्रोत्यांसाठी राजकारण, सामाजिक घडामोडींचा अभ्यास, संविधानाने दिलेल्या अधिकारांचे स्पष्ट आकलन असे. आपला आब राखून, उच्च प्रतीचे एटिकेट्स आणि प्रोटोकॉल्सचे आदर्श पालन करण्याचे उदाहरण आपल्यासमोर ठेवणारी माणसे आजकाल दुर्मिळ होत जात आहेत.

- डॉ. स्मिता शहापूरकर, काँग्रेसच्या प्रदेश सचिव.  

 
Top