मुरुम (प्रतिनिधी)-  तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आला.   

दिव्यांगांना सर्वांच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, दिव्यांग मध्ये अधिकाऱ्यांबाबत जागृती व्हावी, दिव्यांगांबाबत शासकीय योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त महाविद्यालयात प्रतिनिधीक स्वरूपात दिव्यांग विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे सायली बिराजदार (बी.ए. द्वितीय वर्ष), अक्षय विजयापुरे (बी.ए. द्वितीय वर्ष), तर नीट परीक्षेची तयारी करणारी राजश्री भोसले (इयत्ता बारावी) या विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त ग्रंथालय परिचर भगवान औरादे यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संजय असेल म्हणाले की,  दिव्यांग व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे यावेळी त्यांनी  कौतुक केले. या सन्मानामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे मनोबल अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, उपप्राचार्य गुंडाजी मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, डॉ. ज्ञानोबा ढोबळे, डॉ. भरत शेळके, प्रा. मुरली जाधव तसेच रजिस्टर राजकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. बी. ढोबळे यांनी केले तर डॉ. भरत शेळके यांनी आभार मानले.

 
Top