धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत एका न्यूज चॅनेल सारखा व्हिडिओ तयार करून बोगस एक्सिट पोल प्रसारित केल्याप्रकरणी 'धाराशिव 2.0' सह इतर 2 इन्स्टाग्राम पेजेसच्या ऍडमिन्स विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा केला असला तरी या मागचा मास्टर माईटवर कारवाई करावी. अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे सोमनाथ गुरव, राकेश सुर्यवंशी, रवी वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

एक्सिट पोल व्हिडिओबाबत तात्काळ तक्रार देण्यात आली. मात्र गुन्हा नोंद करायला इतके दिवस का लागले, हा व्हिडिओ कोणी बनवला, त्या मागचा हेतू काय ? कोणाच्या नंबरवरून पाठवला? या मागचा मास्टर माईंड कोण ? हे सगळे एक षडयंत्र असुन त्याची पोलखोल होणे व सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे अशी मागणी राकेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केली.  पेड व फेक न्यूजचा हा प्रकार असुन मतदानावर याचा फरक पडावा यासाठी हे केले आहे. हा ऍडमिन भाजपचा कार्यकर्ता असून, त्याला अटक करून मोबाईल, लॅपटॉप जप्त करावा. अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.  2004 च्या निवडणूक वेळी सुद्धा पवनराजे निंबाळकर यांचा डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा असे वृत्त छापून आणले. त्यावेळी 484 मतांनी पराभव झाला. फेक न्यूज हा रडीचा डाव खेळण्याचा विरोधकांचा जुना डाव आहे. हे तिन्ही पेज व इन्स्टाग्राम बंद करावे अशी शिवसेनेने मागणी केली आहे.  

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top