धाराशिव (प्रतिनिधी)- नगररत्थोनच्या 147 कोटी रुपयांच्या अंतर्गत असलेल्या धाराशिव येथील सेंट्रल बिल्डिंग जवळील पेट्रोल पंप ते अष्टविनायक चौक डीपी रोडचा शुभारंभ गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक अभिजीत काकडे अमित शिंदे राहुल काकडे राणी पवार अभिजीत पतंगे सनी पवार गणेश घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती सदर काम हे सिमेंट रोड असून उत्तम दर्जा कामात राखावा असे मत यावेळी सर्व नगरसेवकांनी व्यक्त केले यावेळी या भागातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर शिंदे माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे नितीन काकडे कोळी भाऊ व दया काकडे आधी उपस्थित होते रस्त्याचे काम होत असल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पसरले आहे

 
Top