धाराशिव (प्रतिनिधी)- येथील आश्रम शाळेत समस्त बीट मध्ये सर्व आस्थापनांच्या शाळांकडून सोलापूर महानगरपालिका प्रशासन अधिकारी श्री माने आणि वर्धा येथील उपशिक्षणाधिकारी श्री चिलवंते या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
येवती येथील केंद्रप्रमुख हाके यांच्या सेवा गौरव समारंभ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हाके, चिलवंते आणि माने या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत गेला. असे उद्गार माजी मंत्री प्रा. डॉ.लक्ष्मणराव ढोबळे यांनी काढले , ते पुढे म्हणाले की , शिक्षण क्षेत्राचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल तर अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची अत्यंत गरज आहे. या कार्यक्रमासाठी मंगरूळ बीट मधील सर्व शिक्षक काळे, वाले, मुख्याध्यापक श्री ईश्वर क्षीरसागर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक ईश्वर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
