कळंब (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णलाय कळंब येथे पीसीपीएनडीटी (लिंग निवडीस प्रति बंध कायदा1994 व सुधारित 2003) नुसार तालुका स्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

मुलगी वाचली तरच मानवता टिकते हा संदेश देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा लागेल.या घोषवाक्याने कार्यशाळेस प्रारंभ झाला . कळंब च्या उपजिल्हा रुग्णालय  येथे दि .23 रोजी  जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी  अधिकारी,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदशनाखाली पीसीपीएनडीटी तालुका स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.सदरील कार्यशाळेस कळंब तालुक्यातील सर्व पीसीपीएनडीटी सामूचीत प्राधिकारी /नोंदणीकृत सोनोग्राफी/एमटीपी/सामाजिक संघटना/आशा स्वयंसेविका/खाजगी डॉक्टर्स/ एआरटी सरोगसी केंद्र धारक/यांचे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. 

वैद्यकिय अधीक्षक डॉ . नागनाथ धर्माधिकारी  यांनी  कार्यशाळेला मार्गदर्शन करत असताना “एका बाजूस स्त्री विषयक सर्व सुधारणा व बदल घडत असताना दुस-या बाजूस मात्र समाजातील बुरसटलेल्या पुरूष सत्ताक मनोवृत्तीने विज्ञान युगातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून स्त्रियांना संपविण्याचे कट कारस्थान सुरू केले आहे. हे थांबवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  तसेच खबरी योजना  ही  कायद्याअंतर्गत (गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान कायदा) बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करणाऱ्या केंद्रांची माहिती देणाऱ्या नागरिकांसाठी आहे, जिथे माहिती देणाऱ्याला एक लाख पर्यंत बक्षीस मिळू शकते, हेतू स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे आहे, ज्यात माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे मार्गदर्शन करण्यात आले.

सदरील कार्यशाळेस डॉ. सत्यप्रेम वारे यांनी गर्भलिंगनिदानाविरोधात लेक लाडकी अभियान विविध पातळीवर कार्यरत आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी अतिशय निकडीची आहे. कायद्याचा अर्थ आणि ताकद नीट समजून घेऊन समुचित प्राधिकारी व संबंधित यंत्रणेने त्याची चोख अंमलबजावणी केली तर गुन्हेगारांना पकडण्यात आणि लिंगनिदानाला प्रतिबंध करण्यात निश्चितच यश येऊ शकेल. याच उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे मत मांडले.

तसेच डॉ. मंजूराणी शेळके  यांनी उपस्थित असलेल्या सर्व आशा, पी. एच. सी. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी  यांना पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणीवर कशी मात करता येईल याचे सकल असे विश्लेषण करून समजावून सांगितले. ॲड. रेणुका शेटे यांनी देखील कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या कार्यशाळेला जिल्हा समन्वयक कार्यक्रम श्रीमती  सुनीता सांळुके, आय . एम. ए. डॉ. कुंकूलोळ, डॉ. सायस केंद्रे, डॉ. चंद्रकांत लामतुरे, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. वाकुरे, व जिल्हा समन्वयक श्री. अमर सपकाळ, तसेच तालुक्यातील सर्व सोनोग्राफी केंद्र धारक व एमटीपी/ सर्व समुदाय आरोग्य अधिकारी,ए.एन.एम,आशा स्वयंसेविका उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदेशक  तानाजी कदम यांनी केले. तर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम पाटील  यांनी केले. ही कार्यशाळा पार पाडण्यासाठी अधिपरिसेविका, अधिसेविका,  दत्तप्रसाद हेड्डा,  लक्ष्मीकांत मुंडे , मुंजाजी शिकारे, शिवशंकर वीर यांनी सहकार्य केले.

 
Top