धाराशिव (प्रतिनिधी)- सोफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहेमतुल्ला हे एक थोर संत होऊन गेले. धाराशिव शहराच्या दक्षिण भागात त्यांचा भव्य व आकर्षक दर्गा आहे.या दर्ग्याचा दरवर्षी मोठ्या उत्साहात उर्स साजरा केला जातो.या उर्सामध्ये हिंदू–मुस्लिम यासह सर्व धर्मांचे भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.हा उर्स सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असून ही परंपरा सुमारे ७२१ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.
उर्स दरम्यान दरवर्षी संदल मिरवणूक, कव्वाली,मुशायरा,शबे-गझल, महफिल-ए-समा,वाजबयान इत्यादी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.मागील वर्षाप्रमाणे यंदाही वर्ष २०२६ साठी खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन ऊर्स आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
जानेवारी २०२६ मधील उर्स कार्यक्रमांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
२ जानेवारी २०२६ (शुक्रवार) पंखा निवड कार्यक्रम. ३ जानेवारी २०२६ (शनिवार) सेहरा मिरवणूक कार्यक्रम. ४ जानेवारी २०२६ (रविवार) गुसल पाणी मिरवणूक कार्यक्रम. ५ जानेवारी २०२६ (सोमवार) मुख्य संदल मिरवणूक व महफिल-ए-समा कार्यक्रम, ६ जानेवारी २०२६ (मंगळवार) चिरागा कार्यक्रम,कव्वाली व महफिल-ए-समा, ७ जानेवारी २०२६ (बुधवार) कव्वाली कार्यक्रम व जियारत.,८ जानेवारी २०२६ (गुरुवार) वाजबयान कार्यक्रम व नाते शरीफ,९ जानेवारी २०२६ (शुक्रवार ) मुशायरा कार्यक्रम. १० जानेवारी २०२६ (शनिवार) गझल कार्यक्रम. ११ जानेवारी २०२६ ( रविवार) कुस्ती कार्यक्रम,आतिषबाजी व उर्स समाप्ती होणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही वरील सर्व कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वतीने जिल्हा वक्फ अधिकारी,धाराशिव यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणार आहेत.