धाराशिव  (प्रतिनिधी)- शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल  72 रक्तदात्यांनी रक्तदान करून अभिवादन केले.

शहरातील प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने मागील 17 वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी शनिवार  6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शिबिराचे  उद्घाटन सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे ,मैनुद्दीन पठाण, युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ.उज्ज्वला गवळी,नेहा संदीप बनसोडे ,गणेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या  रक्तदान शिबिरात दिवसभरात 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने चहा, फळे व नाष्टा देण्यात आला. यावेळी जिल्हा रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण कर्मचारी दिवसभर उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी सामाजिक नेते निखिल बनसोडे, अमोल बनसोडे,शाहू  धावारे,दादासाहेब मोटे, प्रसाद माने, प्रजोत बनसोडे,  स्वप्नील बनसोडे, सुमित क्षीरसागर,नागराज साबळे ,शैलेंद्र शिंगाडे,प्रसाद बनसोडे, रुपेश बनसोडे,क्षमीनल सरवदे,महेश डावरे, कुमार ओहळ,रिया गायकवाड,रेणुका बनसोडे,लक्ष्मी ढाले, आदींनी  परिश्रम घेतले.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top