धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने सन 2026 च्या अधिकृत दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, लेखाधिकारी संतोष भेंकी, तसेच मंदिर संस्थानचे नागेश शितोळे, अभय रावळे, रमेश कवडे आदी उपस्थित होते. या दिनदर्शिकेमध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या विशेष पूजा, विशेष उत्सव, धार्मिक कार्यक्रम, यात्रा कालावधी, तसेच मंदिर संस्थानच्या महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे. भाविकांना नियोजनपूर्वक पूजेसाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.
