धाराशिव (प्रतिनिधी)- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रसेन्ना ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले,या शिबिरामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांचा सन्मान रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समितीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रसेन्ना ग्रुपचे अध्यक्ष संदिप बनसोडे व त्यांचे सहकारी गेली सतरा वर्षे पासून रक्तदान शिबीर घेऊन रुग्ण कल्याणासाठी योगदान देत आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव समोर ज्ञानसुर्य बी.आर.आंबेडकर बहु.सामाजिक संस्था, बी.आर.आंबेडकर प्रतिष्ठान व सम्राट अशोक धम्मचक्र बहु. प्रतिष्ठान, भक्ती एजन्सी तर्फे आयोजित शिबिरात 23 जणांनी रक्तदान या वेळी प्रशांत बनसोडे, रोहित शिंगाडे, रावसाहेब मस्के, रोहन शिंगाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. रक्तपेढी तंत्रज्ञ इरशाद शेख, निलाक्षी जानराव हे देखील रक्तदान शिबिरात सहभागी झाले. तांबरी विभागातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथे साहस सोशल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिवच्या संयुक्त विद्यमाने घेतले. सध्या शासकीय रुग्णालयातील रक्तसाठा कमी असुन रक्ताची कमतरता भासत आहे. रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

परमपुज्य बोधिसत्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन विविध सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांना रुग्ण कल्याण समिती व सुरक्षा समिती सदस्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य एम डी देशमुख, अब्दुल लतीफ, गणेश वाघमारे, बाळासाहेब जावळे तर प्रभारी अधिष्ठाता डॉ.उज्वला गवळी, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.विवेक कोळगे, पर्यवेक्षक विठ्ठल कांबळे, जनसंपर्क अधिकारी गणेश साळुंखे, तिरुपती केंद्रे, संजय गजधने, बलभीम कांबळे, बाबासाहेब गुळीग, अमर आगळे, सचिन चौधरी, महादेव माळी, श्रीकांत मटकिवाले, अतुल लष्करे, विशाल घरबुडवे, सुमेध क्षिरसागर सह इतर मान्यवर उपस्थित होते.


 
Top