तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील मलबा हॉस्पिटल समोरील जगदाळे पार्किंग येथे मूकबधिर तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तुळजापूर पूर्ण ठाण्यात गुन्हा करण्यात आलेला आहे सदरील घटना सोमवार दिनांक 22 रोजी सायंकाळी सात वाजता घडली.

याबाबतीत कांताबाई अभिमान चौगुले वय 35 वर्षे व्यवसाय घरकाम रा. घाटशिळ रोड, पाण्याच्या टाकीजवळ तुळजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला आत्याचा मुलगा विजय श्रीमंत पवार यांनी फोनवरून कळविले की, मी तुळजापूर च्या बाहेर असून माझा मोठा भाऊ राजेश यास जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हाँस्पिटल समोर येथे काही लोक मारहान करीत आहेत. अशी माहिती मिळाली आहे. तरी तुम्ही तेथे तात्काळ जावा असे कळविल्याने मी माझे सोबत राजेशची पत्नी नंदिनी, आई काशीबाई, मावशी लक्ष्मी असे जगदाळे कॉम्पलेक्स पार्किंग मलबा हाँस्पिटल समोर तुळजापूर येथे गेलो असता माझ्या आत्याचा मुलगा राजेश श्रीमंत पवार यास तु आमच्या भागात का आलास म्हणून तेथील काही लोक मारहान करीत होते. राजेशचे दोन्ही हात बांधलेले होते. व त्यास डोक्याला, पाटीवर, तोंडावरे, बरगडीवर व गुप्त भागावर मारहान करीत असलेले दिसत होते. आम्ही त्यांना सोडवण्यास गेलो असता त्यांनी मला व माझ्या सोबत असलेल्या सर्वांना शिवीगाळ करून, धक्काबुक्की केली. व पुन्हा जर आमच्या भागात हा दिसला तर त्याला जिवेच मारू अशी धमकी दिली. माझा आत मुकबधीर मुलगा राजेश श्रीमंत पवार वय 32 वर्षे रा. घाटशिळ रोड पाण्याच्या टाकीजवळ, तुळजापूर यास मारहान करून, जखमी करणारे लोकांचे

नावाची खात्री केली असता 1) सुरज हरिश्चंद्र जगदाळे 2) प्रतिक जगदाळे 3) गणेश जगदाळे 4) राजाभाऊ देशमाने 5) शंतनू नरवडे व इतर सर्व राहणार तुळजापूर खुर्द असे असल्याचे खात्रीशिर समजले. त्यानंतर आम्ही आत्याचा मुलगा राजेश यास पाहिले असता त्याचे डोक्यात पाटीवर, तोंडावर, बरगडीवर, गुप्त भागावर व शरीरावर इतर ठिकाणी काठीने मारहान झाल्यामुळे पुर्ण शरीरावर काळे निळे वळ दिसत होते. आम्ही त्यास घेवून पोलीस स्टेशन तुळजापूर येथे आलो असता तेथे आत्याचा मुलगा राजेश यास जास्तच त्रास होवू लागल्याने पोलीसांनी उपचारासाठी मेडीकल यादी देवून उपचारासाठी सरकारी दवाखाना तुळजापूर येथे पाठविले असून सध्या त्याचेवर दवाखान्यात उपचार चालू आहेत. या हाणामारी प्रकरणी पाच जनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 
Top