वाशी (प्रतिनिधी)- नाफेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अंतर्गत शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, पारगाव यांच्या वतीने पारगाव येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव (विक्रम) सावंत यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनप्रसंगी सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केशव सावंत यांनी भविष्यात गरजू शेतकऱ्यांना सोयाबीन व हरभरा बियाणे मोफत वाटप करण्याचा संकल्प जाहीर केला. कार्यक्रमास वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर, शिवसेना वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट, युवा सेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले, वाशी नगरपंचायत गटनेते नागनाथ नाईकवाडी, बाजार समितीचे सचिव वाघ साहेब, पोलीस उपनिरीक्षक घोडके, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सचिन इंगोले, नगरसेवक शिवहार स्वामी, प्रवीण गायकवाड यांच्यासह उद्धव साळवी, अशोक लाखे, विलास खवले, दिनकर शिंदे, राहुल आडुमटे, राजाभाऊ जोगदंड, सतीश गव्हाणे, तुकाराम गव्हाणे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 
Top