कळंब (प्रतिनिधी)- कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था ट्रस्ट, बेळगाव महाराष्ट्र- कर्नाटक-गोवा यां तीन राज्याचा वतीने आयोजित राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2025 हा भव्य आणि प्रेरणादायी पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. समाजसेवा, सामाजिक बांधिलकी, शिक्षण व वैचारिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा . डॉ. अमर कांबळे (अध्यक्ष, नालंदा विद्यापीठ, कोल्हापूर) हे होते. तर दीपप्रज्वलन मिस इंडिया शुभांगी शित्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात मिलिंद आळणे, कळंब चे सुपुत्र प्रा.डॉ. श्रीराम मुळीक यांना त्यांच्या समाजोपयोगी, प्रेरणादायी व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन आदर्श समाजभूषण, शिक्षण गौरव पुरस्कार (राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2025) प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून अनेक युवकांना प्रेरणा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रकाश कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून समाजसेवेचे महत्त्व विशद केले. हा गौरव सोहळा कोल्हापूर येथे संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
