धाराशिव (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील पखरुड येथे वडाचा मळा वस्ती ते सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर तसेच इतर कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मंजूर आहेत. ती कामे न करताच निधी हडप करून ग्रामस्थांची अडचण व शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या बोगस कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.17 डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले असून आजचा दुसरा दिवस आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भूम तालुक्यातील पखरुड येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिलेली आहे. यामध्ये वडाचा मळा वस्ती ते सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीपर्यंतच्या रस्ता कामास मंजुरी 2021-22, माळेवाडी शिव ते बाराभाई मळा वस्ती रस्ता कामास मंजुरी 2023-24, जिल्हा परिषद शाळा पखरुड ते प्रभाकर वरबडे यांच्या शेतापर्यंत रस्त्यास मंजुरी 2024, प्रभाकर वरबडे यांचे शेत ते आप्पासाहेब चौकीदार यांच्या शेतापर्यंत रस्त्यास मंजुरी 2024, पिंपळाचे शेत ते भोनाई पाझर तलावापर्यंत रस्त्याच्या शेतात मंजुरी 2024 व भोनाई पाझर तलाव ते माळेवाडी शिव रस्ता मंजुरी 2024 या वरील रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिलेली आहे. यापैकी एकही काम पूर्ण झालेले नाही. ज्या कामाचे बिल उचलले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. 

रस्ता निकृष्ट असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करा लागत आहे. तसेच शेतातील ऊस, सोयाबीन, ट्रॅक्ट, बैलगाडी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे वरील कामे करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी. या मागणीसाठी अमित चव्हाण, मेघराज चव्हाण व अर्जुन चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

 
Top