भूम (प्रतिनिधी)- जेएसपीएम पुणे संचलित बार्शी येथील भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालय (बीआयटी कॉलेज) मध्ये अध्यक्ष प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व संकुल संचालक ऋतुराज सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या करिअरच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयत नेक्सानोव्हा प्रोटेक या कंपनीच्या सहाय्याने भव्य अशा कॅम्पस ड्राईव्हचे अयोजन करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. व्ही शेटे यांनी दिली.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये ए.जी.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, व्हीव्हीपी कॉलेज सोलपूर, बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, श्री शिवाजी महाविद्यालय, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव, इत्यादी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील इंजिनिअरिंग, एमसीए, बीसीए, एम.एससी, बी एस्सी, या पदवी अभ्यासक्रमाला शेवटच्या वर्षात शिकणारे 350 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. नेक्सानोव्हा या कंपनीच्या वतीने निवड समितीमध्ये स्वप्नाली लाटकर, प्रदीप मोरे, यांनी टेक्निकल टेस्ट, प्रोग्रामिंग टेस्ट आणि मुलाखत इत्यादी निकषाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली.
प्लेसमेंट मध्ये देखील महाविद्यालयने आघाडी घेतली आहे, असे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. गजानन बुरगुटे म्हणाले. हा ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी डिपार्टमेंटल कोऑर्डिनेटर प्रा.जे. के. पाटील, प्रा.ए.के .माळी, प्रा.सय्यद, प्रा.गीते यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
