भूम (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस शालेय जीवनामध्ये स्पर्धा वाढत असून फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना कलागुणाचे क्रिडा क्षेत्रातील शिक्षण देखील दिले पाहिजे आणि त्याचा वापर देखील पालकांनी विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे. असे आवाहन शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रल्हाद आडागळे यांनी केले आहे.
दिनांक 11 डिसेंबर रोजी भूम शहरातील श्री गुरुदेव दत्त विद्यामंदीर मध्ये पालक मेळाव्याच्या बैठकीत बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, आजच्या युगामध्ये प्रत्येक कुटुंबात मोबाईलचा जास्त वापर केला जात आहे. विद्यार्थीही मोबाईल मध्ये व्यस्त राहत असून वेगवेगळ्या प्रकाच्या गेम खेळ खेळतात. यामुळे डोक्यावर मेंदूवरही परिणाम होत आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांना ग्राऊण्ड मध्ये खेळू दिले पाहिजे. गुरुदेव दत्त हायस्कूल विद्या मंदिर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकली शिक्षण दिले जात आहे हि एक कौतुकाची बाबा आहे. आयटी एस परिक्षेमध्ये विद्यार्थी राज्यात पहिले, दूसरे विद्यार्थी येतात. या श्रीगुरुदेव दत्त विद्यामंदिर मध्ये संस्कृतिक कार्यक्रम व सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला जात आहे. येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोपासल्याचे दिसून आले. यावेळी बऱ्याच पालकांनी येथील शाळेचे व शिक्षकांचे कौतुक करून आभिनंदन हि केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे आध्यक्ष विजय मोटे, प्रमुख पाहुणे प्रल्हाद आडागळे, दिपक जाधव, हनुमंत सोनटके, सरिता बोत्रे, गितांजली उगलमोगले
मुख्याध्यापिका श्रीमती ए.जे. मुंडे, आर. यु. भोरे, बी. एम. भोरे, डी. जी. पोतरे, बी. ए. गायकवाड, एस. जे. मुळे, डी. बी. दहिफळे, आर. सी. मोरे, दूरुगकर मॅडम, घाडगे मॅडम, वाळके मॅडम, बांगर मॅडम आदीसह मोठ्या प्रमाणात पालकही उपस्थित होते.
