धाराशिव (प्रतिनिधी)- पाणलोट, एकल महिला, निराधार मुले यांच्यासाठी आयुष्यभर सचोटीने संघर्ष करीत समाजवादी विचारसरणीने निरलस आयुष्य जगणारे जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी धाराशिव जिल्ह्यात भूकंपग्रस्त भागातील मुलांसाठी बांधलेल्या ‌‘आपलं घर' या संस्थेत अखेरचा श्वास घेतला. सामाजिक कार्यकर्त्यासाठी त्यांची ओळख ही भाऊ या नावानेच होती भाऊंचे जाणे म्हणजे अनेक अर्थाची पोकळी आहे. भाऊंचा प्रवास नेहमी राज्य परिवहन मंडळाच्या बसनेच असायचा. भाऊ निराधार, अनाथ, वंचितासाठी आयुष्यभर झटत राहिले. समाजवादी पक्ष, जनता पक्ष, पुरोगामी संघटना आणि जन आंदोलनालयाच्या घडणीत भाऊंचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस  (श. प.) पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी श्रद्धांजली  अर्पण करताना  समाजकारण आणि राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे म्हटले आहे.

 
Top