उमरगा (प्रतिनिधी)- येथील आदर्श विद्यालयात घेण्यात आलेल्या गणित साहित्य प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित 151 विविध गणितीय साहित्य सादर केली. या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, धाराशिव येथील डाएटचे प्राचार्य डॉ. दयानंद जेटनुरे,डॉ. बिराप्पा शिंदे, प्राचार्य धनराज खोंडे, मुख्याध्यापक व्यकंट घोडके, माजी मुख्याध्यापक कमलाकर भोसले, मुख्याध्यापक सुदेश माने, प्राचार्य शैफन शेख, प्राचार्य भीमाशंकर सारणे, वाघमारे, पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी, सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
या गणित साहित्य प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित 151 विविध गणितीय साहित्याचे सादरीकरण केले. या वेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले कि- दर्जेदार व गुणक्तेचे शिक्षण सार्वत्रिक झाले पाहिजे. ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळवी यासाठी शालेय स्तरावर विविध प्रदर्शने भरविणे गरजेचे आहे. शैक्षणिक ज्ञानाचे कार्य सर्व सामान्या पर्यंत पोंहचविण्यासाठी कवठा येथील साईग्राम येथे गुरुकूल ते गुगल हा शिक्षकांचा कुंभमेळा भरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गणित हा विषय अभ्यासाचा नव्हे तर जगण्याचा आहे असे सांगताना अधिव्याख्याते डॉ. बिराप्पा शिंदे म्हणाले कि, जीवनाच्या प्रत्येक वाटेत गणित आपल्या सोबत असते. गणित हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गणिता मुळे समाज घडविण्याचे अप्रतिम कार्य केले जाते. आदर्श विद्यालयाने गुणक्तेचा मानबिंदू अखंडीत ठेवल्याचा आपल्याला मना पासून आनंद असल्याचे समाधान डाएटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे यांनी व्यक्त केले. सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, गणित शिक्षिका पौर्णिमा दाहोत्रे यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक प्राचार्य शैफन शेख यांनी केले. सुत्रसंचालन कला शिक्षक तात्याराव फडताळे यांनी केले. आभार प्रशांत सोमवंशी यांनी मानले. या प्रदर्शना साठी पालकांची मोठया संख्येनि उपस्थिती होती. गणित विभागातील पुजा राठोड, दयानंद उमाटे, ज्ञानेश्वर माणिकवार, विकास कांबळे सह आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ईस्माईल मुल्ला व वेदांत गुरव या विद्यार्थ्यानी सादर केलेले गणितीय पोष्टर लक्षवेधी ठरले. सफीया शेख, राजश्री शिंदे, सुभान पठाण, श्वेता दळवे, प्रजोत सगर, वर्षा शिंगारे, धनश्री स्वामी, श्रावणी स्वामी, राधा गवळी, हर्षदा कुलकर्णी, जोरावीन सास्तूरे प्रांजली स्वामी, सोविया शेख, उजेर शेख, महिरा काजी, प्रतिक शिंदे, अबुतली सय्यद, शाहिस्ता सय्यद, आदित्य चव्हाण, मयुरी झाकडे, श्रेयश ग्राम,अमित सुरवसे या इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गणित साहित्यांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
