तुळजापूर (प्रतिनिधी)- बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यातील गरजू दहावीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नसंचांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार असून त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करणारा आहे.
तामलवाडी येथील सरस्वती माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बालाजी अमाईन्सचे जनरल मॅनेजर श्री. शास्त्री व ऑफिस इन्चार्ज श्री. मारुती सावंत यांच्या हस्ते प्रश्नसंच वितरण करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी सराव परीक्षांमध्ये या प्रश्नसंचाचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी, असे मार्गदर्शन केले व कंपनीच्या संचालक मंडळाचे आभार मानले. या कार्यक्रमात पुढील ६ शाळांना अपेक्षित प्रश्नसंच भेट देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अरळी बु. महात्मा गांधी विद्यालय, वडगाव काटी
श्रीराम विद्यालय, धोत्री नरेन्द्र बोरगावकर विद्यालय, देवकरळी छत्रपती शिवाजी हायस्कूल, पिंपळा खुर्द कार्यक्रमास संस्थेचे संचालक बाळासाहेब जगताप, पत्रकार संतोष मगर, विठ्ठल नरवडे सर, बोबडे सर, डोंगेरे सर, स्वामी सर, शिणगारे सर, गुड्ड सर तसेच बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालाजी अमाईन्सची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.
