उमरगा (प्रतिनिधी)-  नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे किरण गायकवाड यांनी 54.90 टक्के मते घेत भाजपाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य यांच्यावर 6284 मतांनी विजय मिळवला. शिवसेना (शिंदे) 12 नगरसेवक, काँग्रेसचे 6, भाजपाचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे 2 तर शिंदे सेना पुरस्कृत 1 अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाला नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदावर पराजय झाला आहे. निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आघाडीने शहरात विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी उमेदवारावर जीसीबीने गुलाल उधळण्यात आला.

उमरगा नगरपालिका निवडणुकीत धनुष्यबाणासह हाताचा बोलबाला दिसुन आला. नगराध्यक्ष पदावर विजय मिळवताना नगरसेवक पदाच्या 18 जागेवर यश मिळवले आहे. तर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) च्या युतीला 7 जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना उबाठाचे नगराध्यक्षासह सर्वच उमेदवार पराभूत झाल्याने मशाल पूर्ण विझली आहे. नगराध्यक्ष पदासाठी किरण गायकवाड (शिवसेना) 11,660, हर्षवर्धन चालुक्य (भाजपा) 5376, रजाक अत्तार शिवसेना (उबाठा) 4013, प्रभाकर मजगे (वंचित) 136 तर नोटाला 54 मते मिळाली आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे किरण गायकवाड 6284 मतांनी विजयी झाले आहेत.

नगरसेवक पदासाठी प्रभाग एक- सुप्रिया घोडके 1341 (विजयी), विजया सोनकाटे 401 पराभूत, राहुल शिंदे 1297 (विजयी), मनीष कोराळे 404 (पराभूत), प्रभाग दोन - स्वाती स्वामी 1152 (विजयी), संगीता कडगंचे 466 (पराभूत), सचिन जाधव 1279 (विजयी), शरणाप्पा वेळापूरे 383 (पराभूत) प्रभाग तीन - अश्विनी सोनकांबळे 862 (विजयी), मीनाक्षी सुरवसे 679 (पराभूत), धनंजय मुसांडे 973 (विजयी), ईरांना बसगुंडे 460 (पराभूत), प्रभाग चार - यल्लमा विभुते 984 (विजयी) संगीता पालपल्ले 683 (पराभूत), बशीर शेख 826 (विजयी), हणमंत दंडगुले 495 (पराभुत), प्रभाग पाच - दुर्गा धोत्रे 632 (विजयी), शबाना लदाफ 373 (पराभूत), पंढरीनाथ कोणे 596 (विजयी), प्रशांत वरवंटे 460 (पराभूत), प्रभाग सहा - राजेश्वरी स्वामी 991 (विजयी), सुषमा पाचंगे 376 (पराभूत), हंसराज गायकवाड 1053 (विजयी), अनिल सूर्यवंशी 366 (पराभूत), प्रभाग सात - नम्रता शिंदे  929 (विजयी), पृथ्वी कांबळे  428 (पराभूत), पृथ्वीराज साळुंखे  786 (विजयी), ज्ञानेश्वर पाटील  528 (पराभूत), प्रभाग आठ - विशाल काणेकर 463 (विजयी), संजय पवार 434 (पराभूत), फातिमाबी औटी 585 (विजयी), श्रीदेवी घोडके 457 (पराभूत), प्रभाग नऊ - विजय वाघमारे 944 (विजयी), विक्रम मस्के 616 (पराभूत), शमशादबी शेख 759 (विजयी), रिजवाण औटी 688 (पराभूत), प्रभाग क्रमांक दहा - मुस्तफा चौधरी 953 (विजयी), अनिल  सगर 536 (पराभूत), प्रभाग दहा - प्रिया पवार 1126 (विजयी), सुवर्णा शिंदे 304 (पराभूत), प्रभाग क्रमांक 11 - बाबा मस्के 656 (विजयी), प्रदीपकुमार कांबळे 371 (पराभूत), ताराबाई दळगडे  923 (विजयी), फरहीन मुजावर 569 (पराभूत), प्रभाग 12 - अभिजीत मोरे 981 (विजयी), नितीन खमीदकर 869 (पराभूत), दीपाली बिराजदार 974 (विजयी), रेखा सूर्यवंशी 717 (पराभूत), आरती शिंदे 932 (विजयी), महानंदा पाटील 828 (पराभूत) झाले आहेत. निवडणूक निकालानंतर नुतन नगराध्यक्ष किरण गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे आदीसह शिवसेना व काँग्रेस आघाडीने डॉल्बी लावून शहरात विजयी मिरवणूक काढली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी उमेदवारावर जीसीबीने गुलाल उधळण्यात आला.

 
Top