तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवारीत सोशल इंजिनियरिंगचे तत्त्व वापरले. विकासाची भक्कम बाजू मांडली; तर प्रतिस्पर्ध्यांनी पैसा, कुटुंबवाद आणि गटबाजीवर भर दिल्याने मतदार आमच्या बाजूने आले. त्यामुळे निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्ती झाली आहे असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांनी पत्रकार परिषदेत केला.

महाविकास आघाडीचे अमोल कुतवळ, सुधीर कदम, उत्तम अमृतराव, तोफिक शेख, श्याम पवार, आनंद जगताप, नागनाथ भांजी यांच्यासह उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांशी संवादात पाटील आणि मगर यांनी जोरदार हल्लाबोल करताना सांगितले“ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झाली आहे.”महायुतीने सहा कुटुंबांत 14 उमेदवार दिल्याने इतर समाज नाराज; ही नाराजी थेट आमच्या गळ्यात पडली.15 वर्षांच्या सत्तेच्या ठप्प, निरुपयोगी, अनियोजित कारभारामुळे सुज्ञ मतदारांना परिवर्तन हवे होते. “मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुखांनी तयार केलेल्या तुळजापूर विकास प्राधिकरणातून प्रमुख विकासकामे घडली. पण महायुतीच्या सत्ताकाळात तीर्थक्षेत्र तुळजापूरसाठी नक्की काय झाले?”असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. 


 
Top