धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकामध्ये दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एच. एस. आर. पी. प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचा आढावा रस्ते व महामार्ग मंत्रालय,नवी दिल्ली यांच्याकडून घेतला जात आहे.
तसेच,रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या दि.6 डिसेंबर 2018 नुसार 6 डिसेंबर 2018 पासून नोंदणी होणाऱ्या सर्व नवीन वाहनांवर बसविणे बंधनकारक आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना कळविण्यात येते की,1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना बसविण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 अशी देण्यात आलेली आहे. वाहनधारकांनी मुदत संपण्यापूर्वी स्वतःच्या वाहनांवर एच.एस.आर.पी प्लेट बसवून घ्यावी,असे आवाहन करण्यात येत आहे. 31 डिसेंबर 2025 नंतर एच.एस.आर.पी प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा,1988 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापि,31 डिसेंबर 2025 पर्यंत बसविण्यासाठी घेतलेली अपॉइंटमेंट असल्यास अशा वाहनांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी कळविले आहे.